You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळ : पुरादरम्यान या घराच्या बाल्कनीत लोक अडकले 'तो' क्षण
या व्हिडिओमध्ये नेपाळमधल्या भीषण पुरादरम्यान एका घराच्या बाल्कनीत अडकलेल्या लोकांना वाचवतानाचे हे दृश्य. बीबीसी व्हेरिफायने या व्हीडिओच्या सत्यतेची पुष्टी केली आहे.
भीषण पुराच्या तडाख्यातही ही इमारत शाबूत राहिली. मात्र, आजूबाजूच्या इतर अनेक वास्तू पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे.
बीबीसी व्हेरिफायच्या माहितीनुसार, हा व्हीडिओ त्रिशुली नदीच्या लगतच्या परिसरातील आहे.
बीबीसी व्हेरिफायनं या लोकांची ओळख उघड केलेली नाही. मात्र, त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, ते कुटुंब कसेतरी बचावले. दरम्यान, घराच्या छतावर कोणीतरी मदतीसाठी लाल रंगाचा स्कार्फ फडकावत होते.
नंतर पूर ओसरल्यावर लोक त्यांच्या मदतीला आले.
व्हीडिओमध्ये किमान तीन व्यक्ती दिसत आहेत. एक पुरुष, एक स्त्री आणि एक मूल, जे कदाचित एक लहान मुलगी असावी.
हे लोक घराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीसारख्या ठिकाणी अडकलेले दिसत होते.
मोठे दगड, ढिगारे आणि ॲस्बेस्टॉसचे पत्रे वाहून नेत चिखलाचा पूर त्यांच्याभोवती घोंघावत होता.
दरम्यान, घरातील रहिवासी बाल्कनीमध्ये हताशपणे उभे असलेले दिसत आहेत. एक महिला घराच्या छतावर पोहोचून मदतीसाठी लाल रंगाचा स्कार्फ हलवताना दिसत आहे.