You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात पावसाची तूट 11 टक्के; जाणून घ्या पुढील 7 दिवस कुठे कसा पाऊस पडणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस कमकुवत राहिला आहे.
कोकण-गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व गुजरात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात पावसाची तूट 11 टक्के
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी 'एक्स'वर दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला उपलब्ध माहितीनुसार, 30 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात पावसाची 14 टक्के तूट आहे.
महाराष्ट्रात ही तूट 11 टक्के इतकी आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या उपविभागांमध्येही पावसाची तूट आहे.
कुठे कसा पडणार पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला उत्तर कोकणात सर्वत्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात सर्वत्र, उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विरळ, मराठवाड्यात तुरळक पाऊस होणार आहे.
तर, 1 सप्टेंबरला उत्तर कोकणात सर्वत्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात सर्वत्र, उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विरळ, मराठवाड्यात तुरळक पाऊस होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा सल्ला
हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या हवामान बुलेटीननुसार, 31 ऑगस्टला कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका पाऊस, आणि ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.
1 सप्टेंबरला कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
कसा आहे 6 सप्टेंबरपर्यंतचा अंदाज?
2 सप्टेंबर : कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस / वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
3 सप्टेंबर : कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस / वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
4 सप्टेंबर: कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
5 सप्टेंबर : कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस / वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
6 सप्टेंबर: कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)